योगदान

नाटक

अभिनयाच्या माध्यमातून तसेच पात्रांच्या उभारणीतून साकारण्यात येणारी गोष्ट म्हणजेच नाटक. मनोरंजनाच्या माध्यमातून समाजातील चालीरीतींचे दर्शन घडवणे, त्यावर भाष्य करणे आणि त्यातून आपला विचार अनेकांपर्यंत पोहोचविणे हाच नाट्याचा मूळ गाभा असतो.

कार्यशाळा

कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांना नाट्याच्या विविध अंगांची ओळख करून दिली जाते. त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याला झळाळी देण्याचे काम कार्यशाळेत केले जाते. अनेक वर्षांच्या अनुभवातून मिळविलेले अमृतकण पुढील पिढीसाठी उपलब्ध करून देणे हाच मुख्य उद्देश कार्यशाळेचा असतो.

नृत्य

नृत्य हे कलेचे असे रूप आहे ज्याच्या माध्यमातून कलाकार भावमुद्रेच्या रूपात आपल्या मनातील विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. नृत्यामुळे जसे विचार पसरवता येतात. तसेच नृत्याच्या माध्यमातून इतरांचे मनोरंजन आणि स्वतःचे आरोग्य अशा दोन्ही गोष्टी साधणे कलाकाराला शक्य होते.

संपर्क